‘TikTok’ च्या संस्थापकाची जोरदार कमाल! ; अंबानी यांना मागे टाकत बनला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती.

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान टिकटॉकच्या संस्थापकाने मिळवला आहे. एका न्यूज ॲपने सुरुवात केल्यानंतर झांग यिमिंग यांनी टिकटॉक तयार केले. आता इन्स्टाग्रामसुद्धा टिकटॉकच्या शॉर्ट व्हिडिओंच्या ट्रेंडचे अनुकरण करते. टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या जगात रोज एक नवीन तारा उगवत असतो.काही तारे त्यांच्या प्रखर तेजाने सर्व जगाला मोहित करुन टाकतो. अशीच काहीशी कहाणी आहे TikTok हे रिल्स संदर्भात एप्लिकेशन तयार करणारे झांग यिमिंग यांची. त्यांनी अलिकडेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे.

मुकेश अंबानी यांना मागे टाकत बाईटडान्स म्हणजे टीकटॉकचे संस्थापक आशियातील झांग यिमिंग हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची नटवर्थ ९२.८ अब्ज डॉलर झाली आहे. तर मुकेश अंबानी यांची ८६.९ अब्ज डॉलर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थात गौतम अदानी यांचा नंबर कायम असून त्यांची संपत्ती ११७.४ अब्ज डॉलर आहे. ही फोर्ब्सच्या ताजी रँकींगची आकडेवारी आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles