माजी आमदार वैभव नाईक यांची वचनपूर्ती!, आडारी येथे सभा मंडपासाठी २० लाखांचा निधी. ; ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार!

मालवण :  तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी काल संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांना श्री गणेश मंदिर येथे निमंत्रित करून शाल श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, मी आज आमदार नाही परंतु आडारी येथील ग्रामस्थांना जो शब्द दिला होता तो मी पूर्ण केला आहे. येथील ग्रामस्थांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे.माझ्या आमदारकीच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आपण सर्व ग्रामस्थ मिळून श्री गणेश मंदिराची पुनर्बांधणी करीत आहात, हे कौतुकास्पद आहे. आपण सर्वानी अशीच एकजूट कायम ठेवावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, नगरसेवक मंदार ओरसकर,नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, माजी नगरसेविका पूजा करलकर, युवतीसेना प्रमुख निनाक्षी मेथर, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, अमोल वस्त, उमेश मांजरेकर,मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, उमेश चव्हाण, चिंतामणी मयेकर, गणेश चव्हाण, रुपा कुडाळकर, सौ. सरमळकर, सदाशिव गावकर, शिवराम गावकर, सुदर्शन गावकर, योगेंद्र (पप्या) गावकर, भूषण गावकर, राकेश गावकर, दिनेश मुंबरकर, राजेश मुंबरकर, बाळू फाटक, चंद्रकांत कामतेकर, स्वरा कामतेकर, चंद्रकांत जैतापकर, श्रीराम (नाना) गावकर, संजय गावकर, गणेश गावकर,सुजान गावकर, वैभव गावकर, आरंभ गावकर, निखिल करलकर, आदित्य कांबळी, विघ्नेश शिरोडकर, रमाकांत फाटक, मयुरेश फाटक यांसह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles