सावंतवाडीतील ‘त्या’ वादावादी प्रकरणी ‘ह्यांच्यावर’ गुन्हे दाखल.

सावंतवाडी : काल मंगळवार, दिनांक २/१२/२०२५ रोजी सावंतवाडी येथील फॉरेस्ट ऑफिससमोर झालेल्या वादावादी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस ठाण्यात शांतता भंग केल्याबाबत दोन्ही गटातील व्यक्तींवर स्वतंत्र गुन्हा पोलिसांमार्फत दाखल करण्यात आलेला आहे.
यात स्कॉर्पिओ चालक अमरीश यादव (रा. चराठा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजू परब, श्रीमती नीता सावंत- कविटकर, अजय गोंदावळे क्लेटस् फर्नांडिस, ज्ञानेश्वर पाटकर, प्रफुल्ल गोंदावळे वगैरे २० ते २५ जणांवर वाहन अडवून मारहाण, धमकी, शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्ञानेश्वर पाटकर (रा. सावंतवाडी) यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ मधील अमरीश यादव चालवत असलेल्या स्कार्पिओने हुल दिल्याने थांबून विचारले असता चालक वगैरे दोन व अनिल निरवडेकर, विनोद राऊळ वगैरे २० ते २५ जणांनी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा करत असताना मनाई आदेशाचा भंग करून एकमेकाच्या अंगावर धावून जाणे वगैरे पोलीस ठाणे आवारात शांतता भंग व असभ्य वर्तन केल्यावरून अमित परब, क्लेटस फर्नांडिस वगैरे दोन्ही गटातील 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles