विवाहिता अचानक बेपत्ता!

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी-मेर्वी, जांभुळआड येथील रहिवाशी ममता नितीन मांडवकर (वय २१) ही महिला ७ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबतची तक्रार तिचे पती नितीन मांडवकर यांनी १० डिसेंबर रोजी रत्‍नागिरी पोलिस स्‍थानकात दाखल केली आहे.
सदर हरवलेली व्‍यक्‍ती ममता नितीन मांडवकर वय २१ वर्षे शिक्षण- ७ वी, नेसणीस-लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात प्लॅस्टिक चप्पल, उंची ५ फुट ३ इंच, रंग-निमगोरा, गळ्यात मंगळसुत्र, जात-हिंदु (कुणबी), गोंदलेले तीळ नाही, केसांची ठेवण-छोटे काळे, बांधा मजबूत, सोबत ५००/- रु. आहेत. तिच्‍याकडे मोबाईल नाही. हरवलेली व्‍यक्‍ती पावसला बांगड्या भरण्यासाठी जात आहे असे सांगुन राहते घरातुन निघुन गेलेली आहे ती अद्यापपर्यंत परत आलेली नसल्याने तिच्‍या पतीने पोलिस स्‍थानकात ही तक्रार दाखल केली आहे.

कृपया –  सदर महिला आढळल्यास कृपया या मोबाईल क्रमांकावर 7823808879 संपर्क करावा ही विनंती…

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles