सावली फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम ; कळसुलकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सावंतवाडी शहरातील कळसुलकर न्यू इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांना कबड्डी संघाकरिता सावली फाऊंडेशन, सिंधुदुर्गच्या साहित्य देण्यात आले.  यावेळी प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांच्याकडे सदर साहित्य स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान सावली फाउंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा सावली पाटकर, सचिव प्रा. सचिन पाटकर याप्रसंगी म्हणाले की,  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्यास सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग आपल्या सदैव पाठीशी राहील. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भुरे यांनी आपण आपल्या प्रशालेतील क्रीडा संघाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. प्रशालेच्यावतीने व संस्थेच्या वतीने आम्ही आपणास मनःपूर्वक धन्यवाद देतो, असे मत व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ लिपिक वैभव केंकरे, क्रीडा शिक्षक श्री.  धारगळकर सर, संघ व्यवस्थापक नंदिनी कदम, प्रशिक्षक वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles