इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा ‘स्पोर्ट्स फेस्ता’ उत्साहात साजरा!

सावंतवाडी: तालुक्यातील तळवडे येथील गुरुवर्य बी.एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता 2025-26 अतिशय उत्साहात आणि खेळमेळीच्या वातावरणात पार पडला. विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी येथील महेद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारांचे महत्त्व विशद करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान स्पोर्ट्स फेस्ताचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य क्रीडा अविष्कारांचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्री. नितीन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक श्री. अजय बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र तसेच सांघिक विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका टीना फर्नांडीस व प्रिया मल्हार यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles