Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

माजी सैनिक संघटना (आयईएसएल) सिंधुदुर्गची सभा उत्साहात संपन्न.

सावंतवाडी :  दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी आय.ई.एस.एल. माजी सैनिक संघटना सिंधुदुर्ग यांची मासिक सभा संघटना अध्यक्ष शशिकांत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक नागरी पतसंस्था हाॅल, कोलगांव येथे उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये अनेक माजी सैनिकांनी आपले विचार मांडले तसेच अनेक प्रश्नही उपस्थित केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातून बेळगाव येथे जाणाऱ्या एस.टी.बस बेळगाव रेल्वे स्टेशन मार्गे जाव्यात, असे पत्र कणकवली विभागीय कार्यालयात देण्यात आले आहे त्याचा पुन्हा पाठपुरावा करावा जेणेकरून माजी सैनिकांना बेळगाव सेंटर येथे जाणे सोयीस्कर होईल.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जेथे पार्किंग सुविधा आहे तेथे माजी सैनिकांना मोफत पार्किंग सेवा उपलब्ध करून देण्यात यावी आणि तसे पत्र त्या त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका यांना देण्यात यावे असा ठराव करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील दक्षता समितीवर माजी सैनिक यांना सदस्य म्हणून घेण्यात यावे असे पत्र प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावे असाही ठराव करण्यात आला तसेच माजी सैनिक उमेश कारिवडेकर यांच्या जमिन प्रश्नासाठी दूरध्वनीवरून सावंतवाडी तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि कलम 155 खाली दुरुस्तीबाबत जमिन प्रकरण मार्गी लावण्यासाठी सांगण्यात आले, आपण सदर प्रश्न लवकरच सोडवू असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. सैनिकांच्या वैयक्तिक प्रश्ना करिता तसेच त्यांच्या शासकीय कामातील अडचणी करिता संघटनेने सदैव प्रयत्न करावे असेही ठरविण्यात आले.

माजी सैनिकांच्या विविध संघटनांशी संपर्क साधून समन्वयाने कार्य करावे जेणेकरून माजी सैनिकांमध्ये वेगवेगळ्या संघटना असूनही गटतट आहेत असे निदर्शनास येऊ नये अशा पद्धतीने एकत्रितरित्या काम करावे असेही ठरविण्यात आले. प्रत्येक नवीन रिटायर्ड/निवृत्त माजी सैनिक यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात यावा, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मासिक सभा घेण्यात यावी असेही ठरवण्यात आले. पुढील सभेस जास्तीत जास्त माजी सैनिकांनी हजर राहावे आणि आपल्या अडीअडचणी संघटने समोर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.
सदर सभेस जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, कार्याध्यक्ष सुभाष सावंत, सचिव दीपक राऊळ, उपाध्यक्ष श्री. राणे, कृष्णा परब, पतसंस्था अध्यक्ष बाबुराव कविटकर, संचालक चंद्रशेखर जोशी, तालुकाध्यक्ष व्हिक्टर पिंटो, बाळकृष्ण गावडे, शशिकांत मोरजकर, उमेश कारिवडेकर आदी प्रमुख पदाधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles