सावंतवाडी : ‘भ्रष्ट अनितीला करा लक्ष्य, न्याय्य हक्कासाठी व्हा दक्ष.!’ असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ कार्यरत आहे. पत्रकारितेतील नैतिकता जपणाऱ्या संघाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक दबदबा राहिला आहे. श्री जय भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर याच पद्धतीने संघटनेचे कामकाज चालू राहील, असा विश्वास श्री विशाल परब यांनी व्यक्त करत श्री जय भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
जय भोसले यांचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केलं अभिनंदन.!
0
112