‘पोलीस रेझिंग डे’ सप्ताहानिमित्त सावंतवाडी पोलीस स्टेशनमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन.

सावंतवाडी : पोलीस स्थापनादिन सप्ताहाच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वेळात महिला पोलीस अंमलदार, पोलीस कुटुंबीय तसेच इतर महिला ग्रुपकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा स्पर्धात्मक उपक्रम महिलांच्या मनोरंजनाकरता राबवण्यात आला.


तसेच दिनांक ७ जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व युवा रक्तदाता संघटना, ऑन कॉल ब्लड ग्रुप यांच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी १.३० दरम्यान रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच विविध नागरिक अशा तब्बल ४० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. नमूद शिबिराचे उद्घाटन व उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी श्री विनोद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. दयानंद गवस, युवा रक्तदाताचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सूर्याजी, रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच कुडाळ, वेंगुर्ला, निवती, दोडामार्ग, बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles