यंदाचा मानाचा ‘वेताळ करंडक’ जनता विद्यालय तळवडे, श्री शिवाजी हायस्कूल तुळस यांना संयुक्तरित्या प्रदान! ; ‘अश्वमेध तुळस’ महोत्सवात शालेय सांस्कृतिक स्पर्धा रंगल्या!

वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस येथे आयोजित अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय सांस्कृतिक स्पर्धांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.माध्यमिक व प्राथमिक गट अशा दोन विभागांत झालेल्या या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला, बुद्धिमत्ता व सादरीकरण कौशल्याचे प्रभावी दर्शन घडले.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई उपस्थित होते.याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेतून निवडून आलेल्या नगरसेवकांचा वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


सन्मानित नगरसेवकांमध्ये अँड. सुषमा खानोलकर, शीतल आंगचेकर, रीया केरकर, लीना म्हापणकर, गौरी माईणकर,गौरी मराठे, आकांक्षा परब, सदानंद गिरप, रवींद्र शिरसाठ, प्रणव वायगणकर, प्रीतम सावंत व सचिन शेट्ये यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले,
“शालेय जीवनात मिळणाऱ्या अशा सांस्कृतिक संधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कला, संस्कृती आणि स्पर्धात्मकता यांचा समन्वय साधणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात.”
तर नगराध्यक्ष राजन गिरप म्हणाले,
“विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे कार्य अशा महोत्सवांतून घडते. वेताळ प्रतिष्ठानसारख्या संस्थांचे हे कार्य कौतुकास्पद असून भविष्यातही अशा उपक्रमांना नगरपरिषदेचे सहकार्य राहील.”

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – 
समूहगीत गायन स्पर्धा (मोठा गट) मध्ये – 
प्रथम: नेमळे पंचक्रोशी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे,
द्वितीय: श्री शिवाजी हायस्कूल, तुळस,
तृतीय: जनता विद्यालय, तळवडे यांनी क्रमांक पटकावले.

प्रश्नमंजुषा स्पर्धा (मोठा गट) मध्ये – 
प्रथम जनता विद्यालय, तळवडे,
द्वितीय नेमळे पंचक्रोशी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे,
तृतीय श्री शिवाजी हायस्कूल, तुळस यांना यश मिळाले.

समूह नृत्य स्पर्धा (मोठा गट) मध्ये – 
प्रथम श्री शिवाजी हायस्कूल, तुळस,
द्वितीय जनता विद्यालय, तळवडे,
तृतीय न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा यांनी पारितोषिके पटकावली.

वेशभूषा स्पर्धा (मोठा गट) मध्ये –
प्रथम वेदांत सावळाराम नाईक (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा),
द्वितीय वरदा संदीप परब (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला),
तृतीय प्रांजल रुपेश नार्वेकर (उभादांडा क्र. ३) यांनी क्रमांक मिळवले.

सोलो डान्स स्पर्धा (मोठा गट) मध्ये –
प्रथम निधी खडपकर (मिलाग्रिस, सावंतवाडी),
द्वितीय वैष्णवी देऊअप्पा बोडके (मदर क्वीन, सावंतवाडी),
तृतीय सई रामदास राऊळ (स. का. पाटील विद्यामंदिर, केळुस) यांनी यश संपादन केले.

समूहगीत गायन स्पर्धा (लहान गट) मध्ये –
प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेंडूर,
द्वितीय जयहिंद विद्यालय, तुळस फासतळी,
तृतीय श्री वेताळ विद्या मंदिर, तुळस यांनी क्रमांक मिळवले.

यावर्षी माध्यमिक शाळांच्या सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी देण्यात येणारा मानाचा ‘वेताळ करंडक’ संयुक्तरित्या जनता विद्यालय, तळवडे आणि श्री शिवाजी हायस्कूल, तुळस यांना प्रदान करण्यात आला.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळाली असून उपस्थित पालक, शिक्षक व रसिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. स्पर्धेचे परीक्षण महेंद्र मातोंडकर, नागेश नाईक, रूपेंद्र परब आणि प्रा. विवेक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार बी. टी. खडपकर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles