कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्तचा ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के!

सावंतवाडी : कला संचालनालय, महाराष्ट्र मार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा- एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षांचा कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तचा निकाल 100 टक्के लागला.

एलीमेंटरी परीक्षेला एकूण 22 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ‘ए’ श्रेणीमध्ये 3, ‘बी’ श्रेणीमध्ये 3 तर ‘सी’ श्रेणीमध्ये 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
इंटरमिजीएट परीक्षेला एकूण 27 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी ‘ए’ श्रेणीमध्ये 8, ‘बी’ श्रेणीमध्ये 7 तर ‘सी’ श्रेणीमध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री.शिवाजी सावंत, सचिव श्री.यशवंत राऊळ, सहसचिव श्री.चंद्रकांत राणे , मुख्याध्यापक अभिजीत जाधव व सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक शरद सावंत यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles