मळगाव वाचनालयातर्फे ३० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा.

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील कै.प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित कै. प्राचार्य रमेश कासकर मित्रमंडळ प्रायोजित स्व. प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०. वाजता ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात करण्यात आले आहे. स्पर्धा शालेय विद्यार्थ्यासाठी असून पाचवी ते सातवी गटासाठी १) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या कथा २) संस्कार कथा हा विषय असून वेळ चार ते पाच मिनिटे आहे. या गटामधून प्रथम रु.५५१/- द्वितीय रु.४५१/-, तृतीय रु.३०१/-, उत्तेजनार्थ २ प्रत्येकी रु.१०१/- याप्रमाणे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र, ग्रंथभेट देण्यात येणार आहे. आठवी ते दहावी या गटासाठी १) स्वामी विवेकानंदांच्या कथा २) विज्ञान कथा विषय असून वेळ पाच ते सहा मिनिटे आहे या गटातून प्रथम रु.७५१/-, द्वितीय रु.५५१/-, तृतीय रु. ३५१/-, उत्तेजनार्थ २ प्रत्येकी रु.२०१/-याप्रमाणे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र, ग्रंथभेट देण्यात येणार आहे. एका शाळेतून जास्तीत दोन स्पर्धकांना एका गटातून भाग घेता येईल. स्पर्धक व शाळांनी आपले नोंदणी दि.२९ जाने. २०२६ पर्यंत ग्रंथपाल श्री. आनंद देवळी मो.नं. ९४२११४९३४४, ९०२९८९८२९० यांचेकडे करावी. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रोत्साहित करावे. असे आवाहन वाचन मंदिरने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles