सावंतवाडीत भरधाव इनोव्हाने उभ्या वाहनास व कंपाउंड भिंतीस धडक! ; अल्पवयीन चालक पसार, गुन्हा दाखल.

सावंतवाडी : शहरातील सालईवाडा रवींद्र मंगल कार्यालय परिसरात दिनांक २४/०१/२०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावंतवाडी ते शिरोडा रोडवरून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कार (MH 04 FA 4554) या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभी असलेली टाटा 207 डी.आय. जनरेटर व्हॅन (MH 10 K 7727) यास जोरदार धडक दिली.
या धडकेत जनरेटर व्हॅनचे मोठे नुकसान झाले असून, यानंतर संबंधित वाहनाने रवींद्र मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातील विटांच्या कंपाउंड भिंतीसही जोरदार धडक देत भिंतीचे नुकसान केले. अपघातानंतर संबंधित अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर आरोपी क्रमांक २ आनंद मिस्त्री याने त्याला पळून जाण्यास मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमित रवींद्र आरवारी (रा. सालईवाडा) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अनिल धुरी हे हवालदार महेश जाधव यांच्या मदतीने करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles