अजितदादांसोबत घातपात..?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा! ; हादरवणारी माहिती समोर.

मुंबई : पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतधक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी या पत्रकार परिषदेत अजितदादांचे विमान नेमके कुठे होते, त्या विमानात नेमके काय होते? याबाबतची तंतोतंत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात हा घातपाताचा एक भाग असू शकतो, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. हा दावा करताना रोहित पवार यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्यक्तीला मारण्याऐवजी ड्रायव्हरला मारा –

अजित पवार यांचा अपघात हा घातपात आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मलाही याबाबत शंका आहे. कारण कदाचित ही घटना घातपात असू शकते, असा थेट दावा रोहित पवार यांनी केला. तसेच अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही काही गोष्टींचा शोध घेतला. अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपल्याला मारायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग हा त्या व्यक्तीच्या चालकाला मारणे हा आहे, असे एका पुस्तकात नमूद आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सोबतच अजितदादांसोबत घातपात झाला का? हे शोधण्यासाठी खोलात जावे लागेल. कारण महाराष्ट्रातील एक मोठा नेता गेला आहे. ही घटना हलक्यात घेऊन चालणार नाही, अशी भूमिका घेत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

म्हणून अजितदादांना विमानाने जावे लागले –

अजितदादा यांचे 27 जानेवारी रोजीचे शेड्यूल का बदलण्यात आले?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवरी रोजीच्या वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. त्यावेळी ताफादेखील लागला होता. परंतु दादा गाडीने का निघाले नाहीत? अजितदादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याला यायला उशीर झाला का? ते उशिरा आल्यामुळे अजितदादांना पुढे निघायला वेळ लागला. साडे पाच वाजता अजितदादा गाडीने जाणार होते. त्यांना पर्याय राहिला नाही आणि त्यांना विमान बुक करावे लागले. म्हणूनच दुसऱ्या दिवशीचे विमान सात वाजून 13 मिनिटांना बुक झाल्याचे पाहायला मिळाले, असा दावा रोहित पवार यांनी केला.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles