कुडाळ : आज दुपारी ४ वाजता हुमरस येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा निवेदक प्रा. रूपेश पाटील यांचा ‘खेळ पैठणीचा’ हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. ज्ञान मनोरंजन आणि हास्याचे फवारे असलेला हा दणदणीत कार्यक्रम प्रा. रुपेश पाटील सादर करणार असून हुमरस गावातील माता भगिनींनी या कार्यक्रमास सहभागी होऊन भरघोस बक्षिसे जिंकावी, असे आवाहन सरपंच सीताराम तेली यांनी केले आहे.
कुडाळ तालुक्यातील हुमरस ग्रामपंचायतीला आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत उंबरे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे. सदर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे हुमरस ग्रामपंचायत सरपंच सीताराम तेली, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व हुमरस ग्रामस्थ यांनी कळविले आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :
दि. ०१/१०/२०२४
सकाळी ८.३० वा. प्रभातफेरी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा हुमरस ते ग्रा.पं. कार्यालय
सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा आरंभ.
दुपारी १२.३० वा. श्री सत्यनारायण महाआरती.
दुपारी १.०० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद.
दुपारी ४.०० वा. हुमरसमधील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा कार्यक्रम’
सादरकर्ते – प्रा. रूपेश पाटील
सायं. ७.०० वा. सत्कार समारंभ.
रात्री ९.०० वा. ग्रामस्थांची भजने
दि. ०२/१०/२०२४
सकाळी ९.०० वा. – गांधी जयंतीनिमित्त गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण.
सकाळी १०.वा. – स्वच्छताविषयक जनजागृती व परिसर स्वच्छता कार्यक्रम.
सायं. ७..०० वा. डबलबारी भजनाचा कार्यक्रम (बुवा श्री. नंदकिशोर कांदे (हुमरस) विरुध्द बुवा श्री. भालचंद्र केळूसकर (मालवण)
स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय हुमरस
निमंत्रक : हुमरस सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि हुमरस ग्रामस्थ …
टिप – डबलबारी कार्यक्रम जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा हुमरस येथे होईल. इतर सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत आवारात होतील.