सावंतवाडी : तब्बल ११९ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा सावंतवाडीतर्फे आज ‘रक्तदान’ क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रसिद्ध ज्येष्ठ डॉ. राजेश गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन बायपास सर्जरी साठी लागणा-या फ्रेश रक्तासाठी कायम रक्तदान करणारे युवा रक्तदाते वसंत सावंत, अथर्व सावंत, सुमित मळीक, संदेश नेवगी, नाविद हेरेकर या रक्तदात्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी राजा स्वार, अभय नियोगी साबाजी नार्वेकर व श्री. बांदेकर यांसह गणेशोत्सव मंडळ सालईवाडाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देव्या सूर्याजी यांचा विशेष सन्मान.!
0
49