वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व आंबा-काजू बागायतदार संघटनेची महत्त्वपूर्ण सभा सोमवारी सायंकाळी ७.०० वाजता येथील देवी सातेरी मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत येत्या गुरुवार दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी आंबा-काजू बागायतदारांचा मोर्चा वेंगुर्ला एसटी डेपो ते तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला व कृषी विभाग वेंगुर्लावर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात बागायतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच आपल्या मागण्यांसाठी एकत्र येण्याचे आवाहन वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय गावडे, एम के गावडे. प्रकाश गडेकर, शिवराम आरोलकर, विजय सरमळकर,चेतन कुबल, सौरभ कुबल, स्वप्निल शिरोडकर, भूषण नाबर, पांडू गावडे, बबन साळगावकर ,नितेश मयेकर यांनी केले.
मोर्चामध्ये बागायतदार आपल्या वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शासनाने तात्काळ बागायतदारांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे.
‘ह्या’ आहेत मोर्चाच्या प्रमुख मागण्या –
– क्षेत्र मर्यादेचा निकष काढून टाकून प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई जाहीर करावी.
– हवामानातील बदलामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झालेल्या बागायतदारांना भरपाई मिळावी.
– काजू पिकासाठी हेक्टरी नुकसान भरपाई ३लाख जाहीर करावी.
– पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
या सभेला श्री. संजय दत्ताराम गावडे, एम. के. गावडे, प्रकाश गडेकर,नागेश ऊर्फ पिंट्या गावडे,शिवराम महादेव आरोलकर, रवींद्र गोपाळ धुरी, विजय सरमळकर, न्हानु वराडकर, लक्ष्मण आनंद गावडे, चेतन चंद्रमोहन कुबल, सखाराम गणपत ठाकूर, स्वप्निल सुरेश शिरोडकर, वृषाल विजय ठाकूर, स्वप्निल प्रकाश गडेकर, सौरभ नितीन कुबल, कृष्णकुमार विजय सरमळकर, भूषण पद्माकर नाबर, सागर चंद्रकांत गडेकर, महेश परब, सतीश पांडुरंग तांबोसकर, विलास झिलू नाईक, गजमुख सिताराम गावडे, भास्कर मधुकर गावडे, योगेश आनंद गावडे, गुरुनाथ विष्णू वेंगुर्लेकर, देव विष्णू गावडे, बबन अनंत साळगावकर, मंदार अरविंद गावडे, नितेश गोपाळ मयेकर आदी आंबा-काजू बागायतदार उपस्थित होते.



