मोठी बातमी! – एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश. ; कोणत्या पक्षाला फटका?

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. आधी नगर पंचायत, नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचे समोर आले होते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे समोर आले होते. मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी – शिवसेनेत मंगळवारी मोठा पक्षप्रवेश पहायला मिळाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि मनसे पक्षाचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्या दिल्या.

या मान्यवरांनी हाती घेतला भगवा झेंडा –

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये बिलोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शेटटीवार, माजी उपाध्यक्ष आनंद गुडमलवार, माजी नगराध्यक्ष देवंण्णा तोंदरोड, चक्रधर पाटील, साईनाथ हंगरगे, नामदेव पाटील देगावकर, वकील अंकुशराजे जाधव, जेजेराव शिंदे, शहाजी बाबरे, सुरेश येलबुगडे, डॉ.सुनील जाधव, सतीश धाने, विठ्ठल कोकणे यांचा समावेश होता.

पक्षाची ताकद वाढली –

तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील सडे गावचे सरपंच आणि माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज पानसंबळ यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बालाजी पाटील खतगावकर, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. तसेच स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढली आहे. याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे. खासकरून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीने विजय मिळवून सत्ता स्थापन केली आहे. तसेच इतर ठिकाणीही शिवसेनेचे सत्ता खेचून आणली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles