मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वैभववाडी महाविद्यालयाचा हर्ष सावंतला कांस्य पदक.

वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कु. हर्ष सावंत याने १२० किलो गटात उल्लेखनीय कामगिरी करीत कांस्यपदक पटकावले आहे. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली व आर. डी. अँड एस. एच. नॅशनल कॉलेज व एस. डब्ल्यू. ए. सायन्स कॉलेज, बांद्रा, मुंबई यांच्या वतीने दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धा (पुरुष व महिला) संपन्न झाली.

या स्पर्धेत वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एस.वाय.बी.एस्सी. वर्गातील विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत याने १२० किलो गटात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. हर्ष सावंत याने स्क्वॅटमध्ये २७० किलो, बेंच प्रेसमध्ये १५० किलो आणि डेडलिफ्टमध्ये २६० किलो वजन उचलत एकूण उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles