दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत धोंडी वरक यांचे सुयश.!

सावंतवाडी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- 2023 मध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक धोंडी गंगाराम वरक यांनी तालुका स्तरावर दोन गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळां मधील शिक्षकांसाठी ही स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झालेले होते. कळसुलकर शाळेचे श्री. वरक यांनी इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी या गटासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली होती. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातून त्यांना दोन्ही गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यानिमित्त सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शैलेश पई, सचिव डॉ. नार्वेकर, सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.व्ही. भुरे, सर्व शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles