पीसीईटी प्रीमिअर लीगमध्ये पुरुषांचा ‘पीसीसीओई वॉरियर्स’ आणि महिलांचा ‘एसबीपीपीएस क्वीन्स’ संघ विजयी!

पिंपरी – पुणे :  पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रावेत येथील अचिव्हर्स क्रिकेट मैदान येथे “पीसीईटी प्रीमिअर लीग २०२६” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, युवा उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीपी प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील, सहभागी शिक्षक, शिक्षकेतर खेळाडू आदी उपस्थित होते.


या स्पर्धेमध्ये संस्थेच्या पीसीईटी, पीसीसीओई, पीसीसीओईआर, पीसीपी, पीबीएस, एसबीपीसीओएडी, एसबीपीसीएससी, एसबीपीपीएस, पीसीयू या शाखांमधील १५ पुरुष संघ व १० महिलांच्या संघानी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत क्रिकेट स्पर्धेत रंगत आणली. प्रत्येकी ६ षटकांचे सामने घेण्यात आले.
पुरुषांचा अंतिम सामना पीसीसीओई वॉरियर्स आणि एसबीपीपीएस स्पार्टन्स या संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना पीसीसीओई वॉरियर्स संघाने निर्धारित ६ षटकांत १०६ धावा केल्या. यामध्ये मॅन ऑफ द मॅच प्रशांत गराडे यांनी १३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ४८ धावांचे योगदान दिले. एसबीपीपीएस स्पार्टन्स संघ निर्धारित ६ षटकांत ६७ धावा करू शकला. या संघाकडून श्रीकांत देशपांडे यांनी सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले. पीसीसीओइ वॉरियर्स संघाने ३९ धावांनी हा अंतिम सामना जिंकला.


महिलांचा अंतिम सामना पीसीसीओइआर वॉरियर्स व एसबीपीपीएस क्वीन्स या संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना पीसीसीओइआर वॉरियर्स संघाने निर्धारित ६ षटकांत ३६ धावा केल्या. एसबीपीपीएस क्वीन्स संघाने हे आव्हान ४.३ षटकांत ७ विकेट्स राखून पूर्ण केले. एसबीपीपीएस क्वीन्स च्या माहेश्वरी पाटील यांनी अंतिम सामना जिंकण्यात मोठे योगदान दिले. त्यांना वूमन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. उत्कृष्ठ कामगिरी करणारे खेळाडू – उत्कृष्ठ फलंदाज (ऑरेंज कॅप) अंकित तांबे (एसबीपीपीएस स्पार्टन), प्रिया डोंगरे (पीसीसीओइआर वॉरियर्स),
उत्कृष्ठ गोलंदाज (पर्पल कॅप) – अंकित तांबे (एसबीपीपीएस स्पार्टन), शीतल मोरे (पीसीसीओइआर वॉरियर्स),
अष्टपैलू खेळाडू – अंकित तांबे (एसबीपीपीएस स्पार्टन), ज्ञानेश्वरी भेगडे (पीसीसीओइआर वॉरियर्स) यांना कॅप, चषक आणि डिजिटल घड्याळ देऊन सन्मानीत करण्यात आले.


या स्पर्धेचे प्रायोजकत्व अधिक रिसॉर्ट, जय गणेश एंटरप्रायझेस, बोना व्हिटा होस्टेल्स आणि राजू टाकळकर ग्रुप यांनी स्वीकारले होते. बक्षीस वितरण उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे, एचआर हेड डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, क्रीडा संचालक संतोष पाचारणे, मिलिंद थोरात, योगेश भावसार, रामदास बिरादार, सुनील जगताप, मदन पवार व सर्व संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात संतोष पाचारणे, डॉ.शितलकुमार रवंदळे, डॉ.प्रवीणकुमार बडदापुरे, मिलिंद थोरात, सागर येवले यांनी सर्व पीसीईटीच्या सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles