कुडाळ – मालवण रस्त्यावर भरधाव ट्रकने स्कुटीला दिली धडक! ; भीषण अपघातात महिला जागीच ठार.

कुडाळ : कुडाळ शहरातील कुडाळ–मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि स्कूटी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटी चालवणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. संबंधित महिला कुडाळच्या दिशेने येत असताना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली गेल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.
हा अपघात सोमवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला.

दरम्यान घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा सुरू केला.
आज होळीचा सण असताना घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत महिलेचे नाव निलिमा मेस्त्री असे असून त्या नेरूर येथे वास्तव्यास होत्या. अपघाताची माहिती मिळताच या भागातील नगरसेविका सौ. श्रेया गवंडे तसेच भाजपचे सामाजिक कार्यकर्ते राजू गवंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावर उपाययोजना न झाल्यास कुडाळ–नाबरवाडी मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा राजू गवंडे यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles