सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी लवकरच सुरू होणार! ; माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांची अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानशी सकारात्मक चर्चा.

सावंतवाडी : माजी मंत्री तथा आ. दीपक केसरकर यांनी आज अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


चर्चेनंतर सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही आणि सहकार्य करण्यात येणार असल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल सुपरिंटेंडंट डॉ. विठ्ठल उद्धार, डॉ. विनायक चकोर, डॉ. राजेश उकरे, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे तसेच पंचकर्म थेरपिस्ट गौरव कुडाळकर आदि उपस्थित होते.

सावंतवाडीतील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने याचा मोठा लाभ होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles