हृदयद्रावक – होय!, ‘त्या’ कोमल चिमुकल्या आता कबरीत शांत झोपल्या ! ; इराणमध्ये ‘त्या’ १६० मुलींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार!

तेहरान : “या छोट्या मुली आपली छोटी …छोटी स्वप्ने उराशी बाळगून शाळेत रोज यायच्या. आई-वडिलांच्या छत्रछायेतून त्या नुकत्याच शिक्षकांच्या छत्रछायेखाली रोज नवनवे धडे गिरवित होत्या. त्यांच्या या छोट्याशा जगातील आनंदात त्या मशगुल होत्या. त्यांचे हे छोटे जग मृदू- मुलायम, प्रकाशाने भरलेले होते. मात्र दुसरे एक जग आहे. शिकाऱ्यांचे हे जग इतके शुष्क…. सुकलेले आहे की ते कोणा दुसऱ्याचा प्रकाश शोषून स्वत:ला जीवंत मानतात. त्यांचे आत्मे इतके अंध:कारमय आहेत की लहान मुलांचा चमकता प्रकाश ते सहन करु शकत नाहीत. त्यामुळे ते ‘त्या’ कोमल प्रकाशाला विझवतात..”

इराणचे असह्य दु:ख व्यतित करणाऱ्या या ओळी एका इराणी दुतावासाने लिहिल्या आहेत. इराणने मंगळवारी इस्राईल-अमेरिकन हल्ल्यात ठार झालेल्या १६० शालेय मुलींना शेवटचा निरोप दिला. या इराणी दुतावासाने या मुलींना चिरनिद्रा घेण्यासाठी खणलेले १६० कबरींचे फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत.

“ऑस्ट्रीयातील इराणी दुतावासाने पुढे लिहिले आहे की त्या छोट्या मुली, त्यांना झोपण्यापूर्वी एक आणखी गोष्ट ऐकायची होती. आता कबरीतील थंड, घुसमटवणाऱ्या शांतते त्या झोपतील.त्यांचे हसणे- खिदळणं जे गल्लीबोळातून घुमायला पाहिजे होते ते कायमचं संपलं.”

“लाज. त्या लोकांना वाटली पाहिजे जे या भयानक घटनेला पाहतात आणि अजिबात विचलित होत नाहीत. त्यांच्यावर जे गुन्हेगारांच्या हातून मुलांचे मृत्यू पाहातात आणि आपल्या अबोल्याने मुकसंमती देत आहेत. तुमचे शांत बसणे एक मत आहे. तुमचे काही न करणे एक शस्र आहे. इतिहास साक्ष आहे तुम्ही कोणाची साथ दिली होती. युएस-इस्राईली बॉम्बहल्ल्यात एका प्रायमरी स्कूलमध्ये १६० हून अधिक शाळेच्या विद्यार्थीनी मारल्या गेल्या होत्या.”

इराण आता दु:खात बुडाला आहे. इराणचे शहर मिनाब येथे मंगळवारी लाखो लोकांच्या गर्दीने १६० मुलींच्या कलेवरावर माती टाकून त्यांना शेवटचा निरोप दिला जे अमेरिकन-इस्राईली हल्ल्यात ठार झाले. खूप काळीज पिळवटून टाकणारे हे दृश्य होते. या मुलींच्या आया छाती आपटून धाय मोकलून रडत होत्या. वडील बदल्याच्या आगीत जळत होते. इराणचे मिनाब शहर या १६० लेकींच्या जनाजात सामील होण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा प्रत्येक माणूस रडत होता.

परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पोस्ट

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी देखील १६० कबरींचे फोटो एक्सवर पोस्ट केले आहेत. त्यांनी या पोस्टला कॅप्शन लिहिली आहे की , ‘या कबरी त्या निष्पाप १६० हून अधिक मुलींसाठी खोदल्या आहेत. युएस-इस्राईली बॉम्ब हल्ल्यात एका प्रायमरी स्कूलमध्ये या मुली ठार झाल्या. त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. मिस्टर ट्रम्प यांनी ज्या बचावाचा वादा केला होता, वास्तविक तो असाच दिसतो. गाझापासून ते मिनाबपर्यंत निष्पापांची निदर्यीपणे हत्या केली गेली.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles