प्रा. सुमेधा सावळ यांना ईगल फाऊंडेशनचा ‘राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार’ जाहीर! ; ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे परस्कारांचे होणार वितरण.

सावंतवाडी : ईगल फाऊंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वा.करण्यात आले आहे. त्यामध्ये बांदा येथील प्रा. सौ. सुमेधा सावळ यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच इतर पुरस्कार विजेत्यांमध्य सौ. वैदही रानडे (रत्नागिरी ), श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव ), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई ), सौ. रुपाली विक्रम यादव ( शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने ( देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील ( कराड), ॲड.स्नेहल भिमराव गुरव ( कोल्हापूर ), सौ. व श्री सुलक्षणा आनंदा कांदळकर( राधानगरी ) ,सौ. स्नेहल संजोग खातू ( रत्नागिरी ) यांचा समावेश आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी सर्वश्री प्रकाश वंजोळे, बाबासाहेब राशिनकर, हणमंत कदम, पत्रकार राजेश जोष्टे, शिरीष कुलकर्णी, शेखर सुर्यवंशी, पत्रकार प्रशांत चव्हाण, दीपक पोतदार, पत्रकार दिनेश कांबळे, पत्रकार सुनील पवार, पत्रकार विजय जगताप, पत्रकार वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे, सौ. सुलक्षणा राशिनकर आदींनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles