घराचं खोदकाम सुरू असताना सापडलं मोठं घबाड! ; कुदळीने खोदताना आला खळ्ळं खळ्ळं आवाज अन् मातीतून चक्क…

बीड : जुन्या काळातील लोक चोरांच्या भीतीने सोनं-दागिने किंवा पैसे जमिनीत पुरून ठेवत असत. त्यामुळे आता काही कामासाठी खोदकाम करताना अनकेदा दागिने किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू सापडतात. असाच एक खजिना बीड जिल्ह्यात सापडला आहे. घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना सापडलेला खजिना पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाचे जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी – बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घराच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात येत होते. या खोदकामादरम्यान चांदीची 250 नाणी आढळून आली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून तहसील प्रशासनाकडे ही नाणी जमा केली आहेत. मात्र यातील बरीच नाणी गायब असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता ही नाणी नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

नाण्यांवर ‘One Rupee India 1941’ असा उल्लेख –

समोर आलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील शशिकांत खुटाळे यांच्या घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मातीच्या ढिगार्‍यात मुलांना चांदीची नाणी आढळून आली. याची चर्चा गावभर पसरली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत आढळून आलेली 250 चांदीची नाणी जप्त केली आहेत. या नाण्यांवर One Rupee India 1941 असा उल्लेख असून ती शुद्ध चांदीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी मोठा खजिना सापडण्याची शक्यता –

महसूल प्रशासनाने ही नाणी ताब्यात घेतली असली तरी याची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तहसील प्रशासनाने पुरातत्व विभागाला याबाबत माहिती दिली आहे. खोदकामादरम्यान जवळपास चार ते पाच किलो नाण्यांचा साठा आढळून आल्याचा संशय आहे. तसेच या ठिकाणी अजूनही मोठा खजिना सापडण्याची शक्यता आहे. ही नाणी कुणी लपवली होती? तसेच सापडलेली इतर नाणी कुणाकडे आहेत? याची चौकशी पोलिसांसह महसूल प्रशासनाकडून सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles