धक्कादायक!- दिवसाढवळ्या हत्येचा थरार! ; पती-पत्नीने मिळून केली प्रियकराची हत्या!

नागपूर : नागपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार पहावयास मिळाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीन मिळून पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकूने हत्या केली आहे. सागर वानखेडे मृतकाचे नाव असून आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला होता. आज सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली. सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहोचला त्यानेही सागरवर अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. .

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles