इन्स्पायर मानक अवॉर्डमध्ये मिलाग्रीसच्या पियुष पेडणेकरची जिल्हास्तरावर निवड!

सावंतवाडी : ‘राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या इन्स्पायर मानक अवॉर्डमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या कु. पियुष भरत पेडणेकर या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.सिंधुदुर्गातील आठ नामांकनामध्ये पियुषला नामांकन मिळालेले आहे.
सदर प्रकल्पासाठी ‘Prevention of drains on roads in rainy season’ हा विषय त्याने निवडलेला आहे.
त्याला प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री मार्टिन डेसा व श्रीम. वर्षा राणे तसेच सर्व विज्ञान शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा,पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles