Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

डॉ. नंदा हरम यांचे ११ ऑक्टोबर रोजी सावंतवाडीत व्याख्यान.

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिरतर्फे कै. सौ. विजयश्री मठकर जयंतीनिमित्त शुक्रवार ११ ऑक्टोबरला पुणे येथील प्रा. डॉ. नंदा हरम यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील विज्ञान’ हा व्याख्यानाचा विषय आहे. डॉ. हरम यांचे ‘अतुट नातं’ काव्यसंग्रह, मार्व्हल ऑफ सायन्स आणि इंजिनिअरींग केमिस्ट्री आदी पुस्तके प्रकाशित आहेत.

प्रा. डॉ. नंदा हरम यांचा ‘अतुट नातं’ हा तिसरा काव्यसंग्रह होय. या संग्रहात विज्ञान कविता आहेत. परंतु त्या विज्ञानाशी संबंधित नाहीत. प्रत्येक कविता प्रयोगशाळेतील प्रयोगांशी आणि प्रयोगशाळेत घडणाऱया गंमतीजंमतीशी संबंधित आहे. परंतु त्या कवितेशेवटी येणार संदर्भ हा आपल्याला जीवनानुभव समजावून जातो. दोन पदार्थांची अभिक्रिया आणि त्याचा दोन माणसांतील ‘केमिस्ट्री’शी जोडलेला निकटचा संबंध किंवा घरातील गृहिणीची स्वयंपाकघरासारखी प्रयोगशाळा आणि तिचे कर्तृत्व असे अनेक किस्से यात येतात.
विजयश्री मठकर यांया कुटुंबियांनी संस्थेकडे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी महिला अगर मुलांच्या समस्यांबाबत मठकर यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी ११ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. नंदा हरम यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्यचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर आणि कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles