झाराप येथे मनसे टेलिकॉम सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन! 

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बांधणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सुरवात केली आहे. सेनेच्या आता टेलिकॉम संघटने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा मध्ये संपर्क कार्यालय खोलून जास्तीत जास्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे.

मनसे च्या टेलिकॉम संघटनेन नुकताच सिंधुदुर्ग झाराप येथे नवीन संपर्क कार्यालयाचे उदघाट्न केले आहे. या कार्यालयाचे उदघाटन मनसेटेलिकॉम सेना अध्यक्ष मा श्री सतीश नारकर यांच्या नेतृत्व खाली टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस मा. श्री अभय पारकर व विभागीय अध्यक्ष मंगेश गोवेकर यांच्या उपस्थित करण्यात आले.
कोकणी माणसाच्या टेलिकॉम संदर्भात योग्य तक्रारीचे निवारण आमच्या मध्यमातून करण्यात येईल. ही शाखा सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व मालवण या तालुक्याना जोडलेली असेल. शाखेच्या उदघाट्न प्रसंगी श्री अभय पारकर बोलत होते.
यावेळी मनसे टेलिकॉम संघटनेचे सरचिटणीस श्री अभय पारकर, विभागीय अध्यक्ष श्री मंगेश गोवेकर, श्री प्रथमेश आरोंदेकर, श्री नागेश पिंगुळकर, श्री संदेश गावडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles