वेत्ये येथे उद्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानासह नारी शक्तीचा जागर! ; जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन., सरपंच गुणाजी गावडे व कलेश्वर महिला ग्रामसंघ यांचा पुढाकार!

सावंतवाडी  : तालुक्यातील वेत्ये येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे तसेच श्री देव कलेश्वर महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत यानंतर सावंतवाडी येथील  पीएसआय सौ. माधुरी मुंळीक यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान हळदी-कुंकू समारंभ, तसेच प्रा. रूपेश पाटील सरांसोबत फनी गेम्स तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत ग्रामपंचायत वेत्ये येथे होणार असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles