जागरूक ग्राहक बनूया, हक्कांचे संरक्षण करूया ! :  प्रा. एस. एन. पाटील

वैभववाडी : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी ग्राहक राजाच्या हक्क आणि अधिकाराचा जागर करीत असताना कर्तव्याचीही जाणीव ठेवली पाहिजे. या डिजिटल युगात व्यवहार करताना सर्वांनी “जागरूक ग्राहक बनूया, हक्कांचे संरक्षण करूया” असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.एस.एन.पाटील यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.नामदव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एस. एन. पाटील बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि सजग ग्राहक बनण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखेचे उपाध्यक्ष श्री. मंगेश चव्हाण आणि सचिव श्री. तेजस साळुंखे यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

विद्यार्थी हा सुद्धा ग्राहकच आहे. सजग विद्यार्थी हाच देशाच्या
उभारणीत महत्वाचे योगदान देऊ शकतो असे अध्यक्षीय मनोगतात डॉ.नामदेव गवळी यांनी सांगितले.
१५ मार्च या दिवसाचे महत्त्व व कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार यांनी प्रास्ताविकेत स्पष्ट केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. आर. बी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थिती होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles