कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचा आज पुरस्कार वितरण सोहळा.

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित उद्या कै.प्रा. मिलिंद भोसले व कै. ॲड.दीपक नेवगी स्मृती पुरस्कार सोहळा आज शुक्रवार दिनांक २० रोजी सकाळी दहा वाजता मळगाव इंग्लिश स्कूल, रस्तावाडी, मळगाव येथे संपन्न होणार आहे. हे पुरस्कार अनुक्रमे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व श्री.शेखर पाडगावकर यांना जाहीर झाले आहेत.
सदर सोहळ्याच्या अध्यक्ष पदी निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.दयानंद दत्ताराम गवस व प्रमुख अतिथी म्हणून कणकवलीचे नगराध्यक्ष श्री.संदेशजी पारकर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मळगाव इंग्लिश स्कूल संस्थेचे सचिव श्री. आर.आर. राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या सर्व कार्यकारिणी सदस्य, आजीव सदस्य आणि साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून सदरचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) तसेच सर्व कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य व साहित्य प्रेमींनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles