काम आ. दीपक केसरकरांचे, कशाला घेता श्रेय फुकाचे? : बाबू कुडतरकरांचा टीकेचा बॉम्ब. ; सावंतवाडी शहरातील विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले!

सावंतवाडी : शहरातील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकीय खडाजंगी रंगली असून शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी प्रभारी नगराध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. योगा सेंटर, खाऊ गल्ली आणि क्रिकेट गॅलरी या प्रकल्पांवरून शहरात राजकीय ठिणग्या उडत आहेत. श्री. कुडतरकर यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांची यादीच पत्रकार परिषदेत सादर करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.

‘या’ यादीत प्रमुख प्रकल्प असे –
–  मोती तलाव काठावरील खाऊ गल्ली.
– जिमखाना येथील क्रिकेट गॅलरी (गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या नावाने)
– मोती तलावासमोरील संगीत कारंजे.
– बॅ. नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण.
– टर्फ क्रिकेट मैदान
– नरेंद्र डोंगरावरील योगा सेंटर.
“या पैकी काही प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर काहींची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प आमदार केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रत्यक्षात येत आहेत. सत्ताधाऱ्यांनी स्वतः शहरासाठी काय आणले ते जनतेसमोर स्पष्ट करावे. आधी मंजूर झालेल्या प्रकल्पांचे श्रेय लाटण्याचा प्रकार थांबवावा,” असा झणझणीत टोला कुडतरकर यांनी लगावला.

दरम्यान, या आरोपांमुळे सावंतवाडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात विकासकामांच्या मुद्द्यावरून आणखी खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles