कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शासनाच्या आदेशानुसार वय वर्ष १४ व १५ वयोगटातील मुलींसाठी HPV व्हॅक्सिन लसिकरणासंदर्भात पालकांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी कणकवली ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य परिचारिका सौ. मुसळे मॅडम व श्री. बुचडे यांनी समाज माध्यमाद्वारे HPV व्हॅक्सिन संदर्भात पसरलेले गैरसमज पालकांच्या मनातून काढून टाकून शासनाची HPV लसिकरणा संदर्भातील भूमिका स्पष्ट करून बालवयातील गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर HPV व्हॅक्सिनने टाळता येतो शासकीय योजनेनुसार HPV लसिकरण मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे असे आवाहन करण्यात आले.

प्रशालेतील उत्कर्षा विभाग प्रमुख सौ .शर्मिला केळूसकर यांनी HPVव्हॅक्सिन लसिकरण संदर्भात पालकांना शासकीय जी.आर. वाचून दाखवून HPV लसिकरण आणि गर्भाशय कॅन्सर या विषयी पालकांना मार्गदर्शन केले प्रशालेच्या आरोग्य विभाग प्रमुख सौ. मुंडले मॅडम यांनी विद्यार्थी व पालक यांची व्यवस्था चोख बजावली यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे कांबळे यांनी उपस्थित पालकांना HPV लसिकरणा संदर्भात मार्गदर्शन करून आवाहन केले .



