मुंबईची लोकलसेवा कोलमडली, कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली! ; प्रवासी संतापले.

मुंबई : लोकलच्या सेंट्रल लाईनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्थानकावर लोकल सेवा खोळंबली असल्याचे समोर आले आहे. 4:14 ची कसारा ट्रेन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ कल्याण स्थानकावर उभी होती अशी माहिती समोर आली आहे. सिग्नल फेल झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

कसाऱ्याकडे जाणारील लोकल कल्याणमध्ये थांबली –

समोर आलेल्या माहितीनुसार, 4:14 कसाऱ्याकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी आहे. ही ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्यामुळे प्रवासी ताटकळले आहेत. ट्रेन उभी असल्यामुळे अनेक प्रवासी डब्याच्या बाहेर आल्याचेही समोर आले आहे. आंबिवली–टिटवाळा दरम्यान दुपारी सुमारे 3:35 वाजता सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली.

सिंग्नल यंत्रणेत बिघाड –

सध्या कल्याणवरून कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाड्या अर्धा तास लेट झाल्या आहेत. कारण टिटवाळा ते आंबिवली दरम्यान लोकल गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे समोर आले आहे. या सर्व गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी आहेत. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रवासी संतापले –

दरम्यान, कल्याण जंक्शन हे मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. या ठिकाणावरून CSMT, कसारा, कर्जत आणि खोपोलीसाठी दररोज शेकडो लोकल आणि एक्सप्रेस गाड्या धावतात. सकाळी 4 च्या सुमारास पहिली लोकल सुरू होते, तर रात्रभर सेवा उपलब्ध असते. फास्ट (जलद) लोकल दादर/CSMT साठी जलद सेवा देतात, ज्या साधारण 50-60 मिनिटांत मुंबई गाठतात. त्यामुळे या स्थानकावर नेहमी गर्दी पहायला मिळते. अशातच आता या स्थानकावर लोकल सेवा विस्कळित झाल्यामुळे अनेक प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles