खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा. : प्रसन्ना देसाई. ; ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव’ अंतर्गत भाजप, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांचे संयुक्त आयोजन.

वेंगुर्ले : भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालय झालेल्या पत्रकार परिषदे वेळी भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, युवा मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेवक प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, पंचायत समिती सदस्य विष्णु फणसेकर तसेच संतोष सावंत, मनोहर तांडेल, सिताराम साळगावकर, वामन गावडे, दशरथ गडेकर, संजय केणी, अर्जुन तांडेल, गौरेश खानोलकर, गिरीश जगताप, अक्षय गावडे यांच्यासह युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गा भाजपा तर्फे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा महोत्सव होत आहे. प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यातील वेंगुर्ले येथे स्पर्धा आयोजित केली आहे. या व्यतिरिक्त तालुक्यात अन्य कार्यक्रमही पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहेत. वेंगुर्ले येथे ही हॉलीबॉल स्पर्धा प्रकाशझोतात खेळविण्यात येणार असून, खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेचे आयोजन ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आले असून, ठिकाण कॅम्प मैदान, वेंगुर्ला असे निश्चित करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹२०,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१०,०००, तृतीय क्रमांकासाठी ₹५,००० आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹५,००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट स्मॅशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिबेरो आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ यांसारख्या वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूस मेडल आणि टीशर्ट देण्यात येणार आहे.
वेंगुर्ले येथे होणारी ही स्पर्धा भव्य दिव्य असून या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व अन्य भागातील संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे नियोजन युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी करत आहेत. संपूर्ण वेंगुर्ले शहरात झेंडे आणि बॅनर लाऊन वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles