सावंतवाडीत भाजप स्थापना दिनानिमित्त सेल्फी पॉइंटचे उद्घाटन!

सावंतवाडी:  भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनसंपर्क अधिक बळकट करण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles