सावंतवाडी : सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची कु. अस्मि धीरज सावंत हिने उल्लेखनीय यश संपादन करत टॉप ५० मध्ये स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही जिल्हास्तरीय परीक्षा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धात्मक परीक्षेत सहभाग घेतला होता. कठोर स्पर्धेतून मार्ग काढत अस्मिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले. या परीक्षेत तिने २०० पैकी १३६ गुण प्राप्त केले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापका सौ. प्राची साळगावकर व शिक्षकवर्गाने अस्मिचे विशेष अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



