✍️ प्रा. रुपेश पाटील…
संघर्षाच्या कणखर वाटेवरून उभा राहिलेला जीवनदीप — कृष्णा वासुदेव चव्हाण.
ह्या बाप माणसाचा आज ८०वा वाढदिवस.



त्यानिमित्त आदरणीय बाबांना आज वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा!!
मित्रहो, जीवन म्हणजे फक्त सुखाच्या सावल्या नव्हेत, तर दुःखाच्या उन्हातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद असते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा वासुदेव चव्हाण. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न खचता, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जिद्दीने उभं राहून त्यांनी घडवलेलं आयुष्य म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे.
कधी कष्टाची कडू चव चाखली, तर कधी जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलला; पण या साऱ्यांमध्ये त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यापासून पाय मागे घेतला नाही. त्यांची जीवनयात्रा म्हणजे संघर्ष, त्याग आणि प्रामाणिकपणाचं तेजस्वी प्रतीक आहे. गरिबीच्या काळ्याकुट्ट छायेतही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आशेचा दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात अनेक स्वप्नं साकार केली.
कृष्णा वासुदेव चव्हाण हे फक्त एक नाव नाही, तर ते एक संस्कारांचं विद्यापीठ आहे. त्यांच्या कष्टाळू हातांनी उभारलेलं कुटुंब आज अभिमानाने उभं आहे. त्यांनी दिलेल्या मूल्यांची शिदोरी, प्रामाणिकपणाचा वारसा आणि जिद्दीचा मंत्र हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.



त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या प्रत्येक सुरकुतीत एक कथा दडलेली आहे, त्यागाची, संघर्षाची आणि अपार प्रेमाची. आयुष्याच्या कठीण प्रसंगातही त्यांनी न ढळणारी चिकाटी दाखवली, आणि म्हणूनच आज त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणं म्हणजे एका महान प्रवासाला सलाम करण्यासारखं आहे.
आज या सुवर्णक्षणी, त्यांच्या आयुष्याच्या या अमूल्य टप्प्यावर, आपण सर्वजण त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंदाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्याचा हा दीपस्तंभ पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरो, हीच मनापासून प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय बाप माणूस कृष्णा वासुदेव चव्हाण!
तुमचं आयुष्य असंच प्रेरणादायी, तेजस्वी आणि आशीर्वादमय राहो… 🌼


आदर्श बाप माणूस – कृष्णा वासुदेव चव्हाण.
कृष्ण चव्हाण यांचे मूळ गाव वेंगुर्ला तालुक्यातील आसोली हे असून त्यांचं सध्या वास्तव्य मालवण येथे आहे. कृष्णा चव्हाण यांचा जन्म 15 एप्रिल 1946 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक स्तरावरील इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण हे आसोली येथील प्राथमिक शाळेत झाले तर पुढील शिक्षण इयत्ता अकरावी पर्यंत शिरोडा तालुका वेंगुर्ला येथील ट्युटोरियल हायस्कूल येथे झाले. पुढे त्यांनी नोकरी केली. पहिली नोकरी सन 1963 मध्ये शिक्षक म्हणून चार महिने केले तर दुसरी नोकरी 1963 मध्येच ते तलाठी म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ही नोकरी केली आणि तिसरी नोकरी त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये 1964 मध्ये पत्करली आणि ती शेवटपर्यंत केली. कृष्णा चव्हाण यांचा विवाह ३० एप्रिल १९६८ रोजी झाला व त्यांच्या सौभाग्यवती या एक आदर्श गृहिणी म्हणून त्यांच्या जीवनात आल्या.

त्यानंतर त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली. त्यावेळी त्यांना रत्नागिरीचे शेवटचे टोक बाणकोट येथे नोकरी मिळाली. दरम्यान ह्याच काळात त्यांना पहिला सुपुत्र प्राप्त झाला, ज्यांचे नाव सुनील हे आहे.

पुढे १९७२ मध्ये दुसरा मुलगा झाला. ज्याचे नाव नरेश आहे. मात्र त्यांचे खरे नाव आजोबांचे अर्थात वासुदेव हे ठेवले गेले आहे.

१९७४ साली त्यांच्या पोटी कन्या रत्न आले.

जिचं नाव प्रतिभा असून त्या सद्य:स्थितीत आजगाव येथील अध्यापक विद्यालयात प्राध्यापिका म्हणून उत्तम कार्य करीत आहेत.
तर शेवटची मुलगी अर्थात सर्वात लाडकी मुलगी ही १९७६ साली जन्माला आली. जिचं नाव ममता असून ती स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत आज ठाण्यातील कळवा येथे स्वतःचे स्कूल अत्यंत दिमाखदारपणे चालवत आहे.




कृष्णा चव्हाण यांनी आपल्या प्रत्येक मुलांचे शिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आणि त्यांचा सांभाळही संस्काररुपी केला. मोठा मुलगा नरेश याला एसटी महामंडळमध्ये नोकरी मिळाली तर दुसरी मुलगी प्रतिभा ही प्राध्यापिका म्हणून आजगाव येथे नोकरी करीत आहे तर दुसरा मुलगा इंजिनियर म्हणून आजरा साखर कारखान्यात नोकरीला लागला त्यानंतर त्याने उत्तुंग भरारी घेतली आहे.
तर ममता हिने पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नोकरी करून नंतर ठाणे येथील कळवा येथे ती आता स्वतःचे प्री – स्कूल चालवित आहे.


कृष्णा चव्हाण यांनी नोकरीत असेपर्यंत सर्व मुलांची लग्न अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडून त्यांनी २०९५ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली याचे कारण म्हणजे त्यांना शेतीची आवड असल्यामुळे त्यांना जमीन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी नोकरीचा काही काळ शिल्लक असतानाच स्वतः रिटायर्ड होत शेतीसाठी कार्य करण्याचे ठरवले. दरम्यान २०१८ साली त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गवासी झाल्याने त्यांचे काही स्वप्न अपूर्ण राहीले. सध्या ते आपल्या चारही अपत्यांकडे ये – जा करत असतात. मात्र सर्वाधिक काळ ते आपली सर्वात लहान मुलगी ममता जी कळवा येथे स्वतःचे प्री – प्रायमरी स्कूल चालवते तिच्याकडे राहत असतात. या अत्यंत प्रगल्भ अशा बाप माणसाची सर्व नातवंडे अर्थात मोठा नातू शुभम,व सुरज, तनिष, लाडकी नात मनस्वी उर्फ राणी यांसह सर्व नातवंडे चांगले शिक्षित झाले आहेत. काही स्वतः वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नोकरी करीत आहेत. हा सगळा प्रपंच चालवत असताना कृष्णा चव्हाण आजही तेवढ्याच ताकदीने आपल्या कुटुंबासाठी अर्थात मुलं, सुना , जावई, नातवंडे या सर्वांसाठी ते आजही झटत आहेत, ही सर्वात जमेची बाजू आहे. अशा या बाप माणसाचा आज ८० वा वाढदिवस चव्हाण परिवार दिमाखात साजरा करीत आहेत. त्यांना आमच्या सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून हृदयापासून शुभेच्छा. त्यांची कौटुंबिक अशीच भरभराट होत राहो आणि त्यांची उरलेली सर्व स्वप्न ईश्वराच्या आशीर्वादाने पूर्ण होवोत, हीच श्री देव पाटेकर व उपरलकर चरणी विनम्र प्रार्थना…! –
✍️- शब्दांकन-✍️
प्रा. रुपेश पाटील,
सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग…



