सावंतवाडी : तालुक्यातील आजगांव तेथील अनेक तरुण व इतर ग्रामस्थांनि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी त्यांना भजन साहित्य तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने टी-शर्ट वाटप करण्यात आले. हा प्रवेश महिला तालुका प्रमुख तथा आजगावच्या सरपंच सौ. यशश्री सौदागर, मळेवाड जि. प. युवासेना विभागप्रमुख निल प्रभुझांट्ये, युवासेना शाखाप्रमुख राहुल आजगावकर व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.