परीक्षित मांजरेकर यांच्या दमदार कामगिरीची वरिष्ठ पातळीवर दखल! ; मांजरेकर यांची शिवसेना BLA प्रमुखपदी वर्णी, कार्यकर्त्यांत तुफानी जल्लोष.

सावंतवाडी : गेली २ -३ वर्षांत केलेली सातत्यपूर्ण संघटनबांधणी, कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ आणि निवडणूक व्यवस्थापनातील कुशलता यामुळे ओळख निर्माण केलेल्या परीक्षित मांजरेकर यांच्या दमदार कामगिरीला अखेर मोठे फळ मिळाले आहे. शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा क्षेत्राच्या BLA प्रमुखपदी त्यांची निवड केली आहे.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मांजरेकर यांनी जिल्हा सचिव म्हणून काम करताना संघटन मजबूत करण्यासाठी घेतलेले शेकडो उपक्रम, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची हातोटी आणि निवडणूक यंत्रणेत दाखवलेली चपळाई याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“ही जबाबदारी म्हणजे विश्वासाचा मान असून, पक्षवृद्धीसाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू,” असा निर्धार मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles