श्री औदुंबर स्वामी मंदिराचा सावंतवाडी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. ; पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व सौ. चव्हाण यांच्या हस्ते पूजन. ; मिलिश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती.

सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्यासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या “श्री औदुंबर स्वामी मंदिरा”चा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.​ यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंत्रघोषाने करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य पसरले होते. प्राणप्रतिष्ठापनेनंतर दिवसभर भजन, व अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने पार पडले. या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक आणि स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, उद्योजक शैलेश पै, शैलेश नाबर, पंचायत समिती सदस्य जितू गावकर ,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे शासकीय ठेकेदार प्रताप मूर्ती, पोलीस कर्मचारी अमित राऊळ, मनोज राऊत, हनुमंत धोत्रे, गौरेश राणे आदींचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अमोल टेंबकर, भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, आर्या टेंबकर ओम टेंबकर, निरंजन सावंत, निखिल माळकर, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, प्रज्वल राऊत, चंद्रकांत धोत्रे, प्रशांत सावंत आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, भाजप युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर, जिल्हा बँकेचे सदस्य विद्याधर परब, सुरेश भोगटे आदींनी या ठिकाणी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles