मंत्री नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी निवड. ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची नियुक्ती यादी.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ना. नितेश राणे हे राज्यभरात स्पष्टवक्ते, आक्रमक आणि हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या तरुण आणि प्रभावी नेतृत्वामध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांच्या या नियुक्तीमुळे रायगड दक्षिण जिल्ह्यात भाजप संघटनात्मक पातळीवर अधिक बळकटी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना. नितेश राणे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles