सावंतवाडीत टपाल सेवांना नवे पंख! ; ‘हरिकृपा एंटरप्रायझेस’मार्फत स्पीड पोस्ट ते COD सुविधा आता स्थानिक पातळीवर.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टपाल सेवांना अधिक गती, सुलभता आणि व्यापकता देण्याच्या दृष्टीने भारतीय डाक विभागाने सावंतवाडी येथे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘हरिकृपा एंटरप्रायझेस’ या संस्थेला अधिकृत फ्रँचायझी एजंट म्हणून मान्यता देण्यात आली असून, नागरिकांना आता विविध टपाल सेवा शहरातच सहज उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमाच्या उद्घाटन व अंमलबजावणीत सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक श्री. नंदकुमार कुरळपकर, अधिक्षक डाकघर दत्ता मसकर, सहाय्यक अधीक्षक प्रकाश गावडे, पोस्टमास्तर अर्जुन मालव, स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक रविकांत मोर्यै, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रामचंद्र वाडकर (निवृत्त एसटी अधिकारी) तसेच फ्रँचायझी चालक सौ. मनीषा राजेश वाडकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

गांधी चौक परिसरातील हॉटेल तारा येथे कार्यरत ‘हरिकृपा एंटरप्रायझेस’मार्फत आता खालील सेवा उपलब्ध -;
✉️ स्पीड पोस्ट
📦 पार्सल सेवा
🌍 आंतरराष्ट्रीय टपाल सेवा
💰 कॅश ऑन डिलिव्हरी (COD) सुविधा.


या नव्या सुविधेमुळे व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, टपाल सेवांसाठी लांब रांगा टाळून जवळच जलद व विश्वासार्ह सेवा मिळणार असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
फ्रँचायझी प्रतिनिधी ‘हरिकृपा एंटरप्रायझेस’ने ग्राहकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9420204838 / 9370714884
या सेवेमुळे सावंतवाडी शहरातील टपाल व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील संवाद अधिक वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles