युवा नेते विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून दोडामार्गात शिवकालीन मर्दानी खेळांचे रंगतदार शिबीर संपन्न. ; विद्यार्थ्यांना लाठी-काठी, तलवारबाजीचे प्रशिक्षण.

दोडामार्ग :  विद्यार्थ्यांमध्ये पराक्रम, शौर्य आणि आत्मसंरक्षणाची भावना रुजवण्यासाठी आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार युवा नेते विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित हे पाच दिवसीय शिबिर दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात पार पडले.
दि. २४ ते २८ एप्रिलदरम्यान झालेल्या या शिबिरात शाळेतील तसेच तालुक्यातील एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांना लाठी-काठी, तलवारबाजी आणि आत्मसंरक्षणाचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धैर्य आणि शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिवकालीन युद्धकलेची ओळख निर्माण झाली. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध डावपेच शिकविल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
या उपक्रमासाठी अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गावडे, पालक श्री गणेश ठाकूर, श्री सोमनाथ नाईक, श्री धाकू वरक तसेच मुख्याध्यापक श्री संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना पूरक आहार उपलब्ध करून दिला.
समारोपप्रसंगी पालक श्री सोमनाथ नाईक यांनी प्रशिक्षकांचा शाल, श्रीफळ व पेन देऊन सन्मान करत आभार व्यक्त केले. या संपूर्ण शिबिराचा आर्थिक भार श्री विक्रांत विकासभाई सावंत यांनी उचलला होता.
दरम्यान, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये परंपरागत युद्धकलेबद्दल अभिमान निर्माण होऊन शारीरिक व मानसिक विकासास चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles