वेंगुर्ला : भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात उद्या बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० :३० वाजता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे’ फाॅर्म वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ६५ वर्षांवरील किंवा त्यावरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी , तसेच मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत. तरी वेंगुर्लेतील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे.
वेंगुर्ला भाजपाच्या वतीने उद्या तालुका कार्यालयात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’चे अर्ज वाटप होणार – जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


