Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

आरवली नंबर १ येथे ‘बांधावरची शाळा’ उपक्रमामध्ये विद्यार्थी झाले शेतकरी.!, विविध उपक्रमांनी शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न.

शिरोडा : ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे शिक्षणाचे अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत खऱ्या अर्थाने जीवन शिक्षणाचे अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर १ या प्रशालेत विविध सहशालेय उपक्रम संपन्न झाले असून विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सदर उपक्रमात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना शेती विषयी प्रेम वाटावे, शेतीकडे पूरक व्यवसाय न बघता प्रमुख व्यवसाय म्हणून महत्त्व देणे व शेतकऱ्यांच्या कामाची जाणीव व्हावी, यासाठी शाळेने ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम घेतला. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ आरोलकर यांनी सहकार्य केले. यावेळी कोकणातला महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. सध्या गणेश मूर्तीची लगबग सर्वत्र कोकणात सुरू असून दोन महिने आधीपासूनच गणेश चतुर्थी म्हणजे रंगरंगोटी करायला सुरुवात होते ती म्हणजे गणपती शाळांमध्ये विविध आसनातील, आकारातील रूपातील गणपती कारागिरकडून घडविले जातात. यामध्ये असलेली हस्तकला, साचे, माती यांचे निरीक्षण या शाळेच्या विद्यार्थ्यांना स्थानिक कारागिरांची क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत घेण्यात आला.

शिक्षण सप्ताहात देखील शिक्षक व विद्यार्थी यांनी विविध उपक्रम हाती घेतले. या अंतर्गत शाळेमध्ये ‘वेशभूषा स्पर्धा’, पाककला व प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विविध कला गुणही सादर केले. त्यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. ‘दप्तर मुक्त शनिवार’, ‘आनंददायी शिक्षण’ या सहशालेय उपक्रमांतर्गत ‘आठवडा बाजार’ हा उपक्रम राबवला गेला. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खरेदी विक्री कौशल्य विकसित व्हावे, स्वकष्ट, संयम ही मूल्ये रुजवावीत, परिमाणांचा, धारकतेचा जिवंत अनुभव विद्यार्थ्यांनी घ्यावा, ही उद्दिष्ट होती. प्रशालेच्या मुख्याध्यापिका वैभवी रायशीरोडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. नेहा गावडे, केंद्रप्रमुख प्रियदर्शनी कावळे, पालक व ग्रामस्थ या उपक्रमावेळी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles