Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

बहुचर्चित ‘बारडोवी’ चित्रपटात सिंधुपुत्राची छाप.!

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे गावचा सुपुत्र रोहित सुरेश वरेकर याने सहकर्मी प्रोडक्शन डिझाईनर म्हणून भूमिका बजावलेला बहुचर्चित ‘बारडोवी’ हा चित्तथरारक चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. मात्र तत्पूर्वी मती गुंग करणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. रोहीत वरेकर याने या चित्रपटातील कलाकारांच्या पार्श्वभूमीस अनुरूप वातावरण निर्मितीसाठी सेट डिझाईन करताना आपले कौशल्य सादर केले असल्याने या चित्रपटाकडे सिंधुदूर्गवासियांचेही लक्ष लागले आहे..
अलीकडेच कान्स फिल्म फेस्टीवल गाजवून आलेली अभिनेत्री छाया कदम यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये प्रथमच पदार्पण केले आहे. ‘बारडोवी’ (Bardovi) या चित्रपटाच्या त्या सहनिर्मात्या आहेत. बारदोवी चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असुन ‘Bardovi Between Death And Rebirth’, असे कॅप्शन देत हे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक करण चव्हाण आहेत. कॅमेरामन विक्रम पाटील, सहनिर्माते विकास डिगे, प्रोडक्शन डिझाईन अरविंद शामराव मंगल, वेशभूषा वृषाली कामते यांनी केली आहे. छाया कदम यांच्या सोबतच चित्तरंजन गिरी आणि विराट मडके हे देखील महत्वाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलरच मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचे या ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे.

रोहित वरेकर सर ज. जी. कला महाविद्यालयात अंतिम वर्षात कलाशिक्षण घेत असताना बारदोवी या चित्रपटात सहकर्मी प्रोडक्शन डिझाईनर म्हणून भूमिका बजावत आहे. त्यामुळे एका रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालेल्या ‘बारदोवी’ चित्रपटात रोहितने आपल्या कलेची एक अनोखी छाप सोडली आहे.
रोहीत वरेकर याने या चित्रपटातील कलाकारांच्या पार्श्वभूमीस अनुरूप वातावरण निर्मितीसाठी सेट डिझाईन करताना आपले कौशल्य सादर केले.बारडोवी हा चित्त थरातक चितपट प्रेक्षकांच्या भेटीस आज शुक्रवारी असून या चित्रपटातून थरारक अनुभव अनुभवता येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपट निर्मिती दरम्यानचा आपला अनुभव व्यक्त करताना रोहित म्हणतो की,”या चित्रपटासाठी मला माझं थोडसं योगदान देण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, या चित्रपटाची निर्मिती कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउन अखेरीस सुरू झाली होती. मुंबई येथील सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधील अरविंद मंगल या माझ्या सीनियरने मला या मूवी संदर्भात कल्पना दिली. त्यांनतर या चित्रपट निर्मितीसाठी आर्ट टीम सोबत काम करण्यासाठी मी तीन ते चार महिने कोल्हापूरला रवाना झालो होतो. दिवसा झोपणे व रात्री शूटिंगच्या सेटवर जाणे, अशी आमची दिनचर्या सलग चार महिने सुरू होती, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles