सावंतवाडी नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग!

सावंतवाडी : शहराच्या सीमेवर असणाऱ्या न.प.च्या कचरा डेपोला आज दुपारच्या वेळी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट वाहू लागले होते. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

येथील कचरा डेपोत सुका कचरा ठेवला जातो. आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट वाहू लागले. आगीन उग्र रूप धारण केल्यानंतर न.प.चे अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडीत, शेखर मेहत्तर, अग्नीशमन नंदू गावकर व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles